Add new comment
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे वडील माणिकराव साहेबराव जगताप यांचे निधन

बीड प्रतिनिधी:-शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे वडील माणिकराव साहेबराव जगताप यांचे वृद्धपकाळाने बीड येथे दुःखद निधन झाले,मृत्यूसमयी त्यांचे वय 80 वर्ष होते .
बीड तालुक्यातील केतुरा येथील मूळ रहिवाशी असलेले माणिकराव जगताप पंचक्रोशीत सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून परिचित होते.
मागील आठवडा भरापासून ते अत्यवस्थ होते,वृद्धपकाळाने त्यांची प्रकृती खालावली होती,त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते,शनिवारी त्यांना बीड येथे आणण्यात आले होते ,शहरातील फिनिक्स रुग्णालयात त्यांना दाखल केले होते,रविवारी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली .
त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे,सोमवारी सकाळी अकरा वाजता केतुरा येथे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
