Add new comment

बीडमध्ये माजी सैनिकांचा मोर्चा आ.परिचारकांचे सदस्यत्व रद्द करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

बीड, (प्रतिनिधी):- सैनिकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणार्‍या आ.प्रशांत परिचारक यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करुन त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी सैनिक संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. आज दुपारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढून माजी सैनिकांनी आ.परिचारक यांचा निषेध नोंदविला.
येथील जिल्हा माजी सैनिक संघटनेच्यावतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आ.प्रशांत परिचारक यांनी देशातील सैनिक व त्यांच्या पत्नी यांच्यातील नात्याबद्दल केलेल्या टिप्पणीचा निषेध नोंदविण्यात आला. सैनिकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणार्‍या आ.प्रशांत परिचारक यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करुन त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी सैनिकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विविध संघटना, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रा.हनुमंत भोसले, शेख निजाम, शेरजमा खान पठाण, हरिसन फ्रान्सीस रेड्डी आदिंची उपस्थिती होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.