जिल्हा कारागृहातून कैदी फरार आज पहाटेचा थरार; बेशुध्द अवस्थेत रूग्णालयात नागरिकांनी केले दाखल

बीड,(प्रतिनिधी):- कारागृहातील सकाळच्या सत्रातील दैनंदिन कामकाज सुरु असतांना दोन कैद्यांनी जेलच्या भिंतीवरुन चढत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरोड्याच्या आरोपाखाली वर्षापासुन शिक्षा भोगत असलेला व बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला दुसरा आरोप दोघांनी संगनमत करत जेलच्या भिंतीवरुन चढत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक आरोपी भिंतीवरुन खाली उडी घेतल्याने बेशुद्ध झाल्याने दुसरा आरोपी जेलमध्येच परतला. सगळा प्रकार आज पहाटे सकाळच्या सुमारास घडला. या प्रकरणी जेल प्रशासन झोपीतच असल्याचे दिसुन आले आहे.
अंबाजोगाई येथील कैदी ज्ञानेश्‍वर बालाजी जाधव (वय ३०) हा दरोड्यातील कैदी असुन गत एक वर्षापासुन जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे तसेच विकास मदन देवकते याच्यावर बलात्काराचा गुन्हा असुन तोही जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. दररोज प्रमाणे सकाळच्या सत्रातील दैनंदिन कामकाज कैद्यामार्फत केले जाते. याचा फायदा घेत दोघांनीही संगनमत करुन जेलच्या आतील बाजूमधील भिंतीवर एकमेकांच्या खांद्यावरुन वीस ते पंचेवीस फुट असणार्‍या भिंतीवर चढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये जाधव हा जागीच बेशुद्ध झाल्याने दुसरा कैदी देवकते हा कारागृहातच परतला. काही वेळ पडून राहिल्यानंतर जाधव हा शुद्धीवर आला. जेल परिसरातून चालत जात मुख्य रस्त्यावर आल्यानंतर तो परत रस्त्यावरच बेशुद्ध झाला. रस्त्यावरुन जाणार्‍या नागरिकांनी त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. हा सगळा होवूनही जेल प्रशासनाला कसलीही माहिती नव्हती. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा कारागृहातील कैदी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जेल प्रशासनाला या बाबत कळविण्यात आले. मात्र मोठी घटना घडूनही जेल प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसुन येत आहे.सकाळच्या सुमारास दैनंदिन काम करत असतांना कैदी वीस ते पंचेवीस फुट असणार्‍या भिंतीवर चढतात कसे? त्यावेळी ड्युटीवर असणारे पोलिस कर्मचारी कोठे होते. तासभर जाधव हा जेलच्या बाहेरील भिंतीजवळ बेशुद्ध अवस्थेत होता. तरीही त्यास कोणी पाहिले नाही. सर्व प्रकरणाचा गुंता वाढला असुन ज्ञानेश्‍वर जाधव हा दरोड्यातील आरोपी असुन जिल्हा रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आहे. जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले असुन पोलिस बंदोबस्त  वाढविण्यात आला आहे.
अन् तो गेला परत
पहाटच्या सुमारास कारागृहाच्या भिंतीवरुन उडी घेत ज्ञानेश्‍वर जाधव हा पळून जात असतांना बेशुद्ध झाला. त्याचा साथीदार मदन देवकते हा भिंतीवरच उभा होता. खाली उडी घेतल्यानंतर जाधव याचे हातपाय मोडले. व तो बेशुद्ध झाला. तेे पाहताच देवकते याने सरळ आतमधील भिंतीवरुन खाली उतरत जेलमध्ये परतणे पसंत केले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.