लाइव न्यूज़
आष्टीतील अत्याचार प्रकरणी कारवाईच्या हालचाली
शिवसेना नेत्या आ.निलम गोर्हेंनी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केल्याने वेग
बीड, (प्रतिनिधी):- आष्टी येथील महिला अत्याचार प्रकरणात एका राजकीय नेत्याचा समावेश असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी लक्ष घातले असुन शिवसेनेच्या उपनेत्या आ.डॉ.निलम गोर्हे यांनी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केल्याने कारवाईच्या हालचाली होवू लागल्याचे सुत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथे एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या प्रकरणात एका बड्या नेत्याचा समावेश असल्याने मागील आठ दिवसांपासुन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात काथ्याकुट सुरु आहे. पिडीत महिलेने पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणात कारवाईसाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याने विशेष पोलिस महानिरिक्षकांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहता विशेष पोलिस महानिरिक्षक भारंबे यांनी स्वत: बीडमध्ये येऊन दिवसभर चौकशी केली. सदरील चौकशी होवून आठ दिवसांचा कालावधी उलटला मात्र कोणतीच कारवाई झालेली नाही. या प्रश्नी शिवसेनेच्या उपनेत्या आ.डॉ.निलम गोर्हे यांनी पोलिस महासंचालक सतिश माथूर यांच्याकडे तक्रार केली असुन या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरण असल्याने तात्काळ गुन्हा दाखल करावा असेही त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन कारवाईच्या हालचाली गतीमान झाल्या असुन संबंधित बड्या नेत्याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.
Add new comment