लाइव न्यूज़
मजुर, कामगारांच्या रेट्यानंतर यंत्रणा हलली; चौदा वाळू घाटांचे लवकरच लिलाव
Beed Citizen | Updated: March 31, 2018 - 3:08pm
बीड, (प्रतिनिधी):- वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया बंद असल्याने वाळू उपलब्ध होत नव्हती. परिणामी जिल्हाभरातील बांधकामे ठप्प झाल्याने त्याच्याशी संबंधित व्यवसायिक, मजुर, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. यासंदर्भात मजुर, कामगारांनी आंदोलने केली. त्यांच्या रेट्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली असुन जिल्ह्यातील १४ वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबतच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या असुन लवकरच वाळू साठे खूले होतील.
बीड जिल्ह्यातील १४ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे. बीड तालुक्यातील आडगाव, रंजेगाव १, रंजेगाव २, नाथापुर, रामगाव १, रामगाव २, खुडंरस, बहादुरपुर, तांदळवाडी, माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली, डुब्बाथडी, छत्र बोरगाव, आडूळा तर अंबाजोगाई तालुक्यातील तट बोरगाव या १४ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया आजपासुन सुरु झाली आहे. ई-टेंडर लिलाव सादर करण्यासाठी २५ टक्के अनामत रक्कम आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
Add new comment