धनगर आरक्षणासाठी मेंढरांसह हजारो समाजबांधव रस्त्यावर

लातूर/रेणापूर,(प्रतिनिधी):- धनगर आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी  या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या वतीने यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी धनगर समाज नेते भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर तहसील कार्यालयावर भव्य आंदोलन मेंढरासह काढण्यात आला या आंदोलनात पारंपरिक वेशभूषेत भांडार्‍याचे उधळण करीत हजारो समाज बांधव उपस्थित होते तोंडाला काळ्या पट्या लावून या ङ्गसनविस सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर म्हणाले की या सरकारने मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांना धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या
कॅबिनेट बैठकी मध्ये  आरक्षण प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु आजवर अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहे केंद्राला शिङ्गारस पाठविण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे टीस या संस्थेला आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी काम दिले आहे परंतु अभ्यास करण्याची गरज काय? एवढे मोठे सक्षम पुरावे हातात असताना देखील वेळ काढू पणाचे धोरण या सरकारने अवलंबले आहे. ज्या समाजाच्या मताच्या माध्यमातून सत्तेवरून खेचण्याचे काम धनगर समाज करेन असा खणखणीत इशारा धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याची घोषणा नागपूर मेळाव्यात मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांनी केली होती परंतु या असुक्षित डोकं ङ्गिरलेल्या सरकारने अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली महापुरुषांचे नाव देण्यासंदर्भात अभ्यास करण्याची वेळ या सरकारने आणली यापेक्षा दुर्दवी काय? केवळ कर्नाटक राज्यात निवडणुका होत असल्यामुळे या राज्यात एका विशेष समाजाचे मतदान आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून चालढकल हे सरकार करत आहे. व कुठल्याही मागणीसाठी अभ्यास करणार्‍या या सरकारचा आता आम्हालाही चांगलाच अभ्यास झाला आहे असा टोला भारत सोन्नर यांनी सरकारला लगावला. परंतु सरकारचा सर्व षडयंत्र करणार्‍या सरकारला येत्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा ही भारत सोन्नर यांनी दिला आहे आंदोलनाचे नेतृत्व  भारत  सोन्नर  व त्यांचे कार्यकर्ते लातूर जिल्हा अध्यक्ष के.आर.वाघमोडे,जिल्हा संघटक अंगद लोकर, बाळासाहेब होळक,र रेणापूर शहर प्रमुख चंद्रकांत अडसकर, सुशील होळकर, सचिन लोकरे, नवनाथ भोकर, खंडू शेंदरकर, गोविंद वाघमोडे, उमेश हुडे, राजन हाके, रणजित खांडेकर, अशोक भावले आदी हजारो समाज बांधव उपस्थित होते

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.