Add new comment

पाण्यासाठी कासारी ग्रामस्थांचे अमरण उपोषण

कासारी, (प्रतिनिधी):- धारुर तालुक्यातील कासारी गावत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्वरित रोहित्र उपलब्ध करून पिण्याच्या पाण्याची सोया करावी या मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. गावालगतचे रोहित्र जळाल्याने आठ दिवसांपासून कासारी गावाला पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यासंबंधी सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अर्जही दाखल केला आहे. मात्र रोहित्र वेळेत मिळत नसल्याने अडचणी निर्माण होर आहेत. महावितरणाच्या कारभाराबरोबरच ग्रामपंचायतींचाही ढिसाळ कारभार असल्याने ग्रामस्थांनी अमरण उपोषणाचे सुरु केले आहे. उपोषणामध्ये भगवान बडे सर, सिताराम जोगदंड, सुजात भई, सिद्राम सोनवने व इतर ग्रामस्थ सहभागी आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.