लाइव न्यूज़
Add new comment
र्हदयविकाराच्या झटक्याने बब्बू पटेल यांचे निधन

बीड, (प्रतिनिधी):- पाचेगावचे सरपंच इम्मु पटेल यांचे बंधू बब्बु सिकंदर पटेल यांचे र्हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पाचेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बब्बु सिकंदर पटेल यांचे आज सकाळी ९.३० वाजता र्हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याची माहिती पाचेगाव परिसरातील नागरिकांना कळाली असता सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. बब्बू पटेल यांच्यावर आज सायंकाळी ५.३० वाजता तकीया मस्जिद येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे. पटेल कुटूंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.
