यु.पी.एस.सी.परीक्षेत यश संपादन केलेल्या भूमीपुत्रांचा ना.पंकजाताई मुंडे यांचे हस्ते मंगळवारी होणार गौरव.
बीड- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. बीड जिल्हयाच्या भूमीपुत्रांनी यात घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचे नाव देशात उंचावण्याचे काम केले आहे.या भूमीपुत्रांचा गौरव दि.1 मे मंगळवार रोजी जिल्हाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे याच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल राजस्थानी समाज मंडळाच्या वतीने दिलीप लोढा यांनी केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात बीड जिल्ह्यातील मयूर काथवटे, प्रणव नहार, रोहित गुट्टे, प्रदीप सोनवणे, जयंत मंकले, मोनिक घुगे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. या यशाने बीड जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा गुणगौरव करणे हे आपले कर्तव्य असुन 1 मे 2018 मंगळवार रोजी राज्याच्या ग्राम विकास,महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार समारंभाचे आयोजन सकल राजस्थानी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.सकाळी 9.00वाजता एल.डी.सी.एक्झिक्युटिव्ह हॉल,हॉटेल साई समोर, जालना रोड, बीड येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल राजस्थानी समाज मंडळाच्या वतीने दिलीप लोढा यांनी केले आहे.
Add new comment