लाइव न्यूज़
अंबाजोगाईत पुढील आठवड्यात मराठवाडा अधिस्वीकृती समितीची बैठक
अंबाजोगाई, (प्रतिनिधी)-मराठवाडा अधिस्विकृती समितीची बैठक ३ मे रोजी अंबाजोगाईत घेण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अधिस्विकृती समितीचे सदस्य वसंत मुंडे, विभागीय माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, समितीचे सदस्य आसाराम लोमटे, अनिल वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप (प्रभारी), यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबैठकीस बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे व स्थानिक पत्रकारांच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठवाडा अधिस्वीकृतीची समितीची पुढील बैठक अंबाजोगाईत घेण्याचा निर्णय अधिस्विकृती मराठवाडा अधिस्विकृती समितीचे वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. मराठवाडा अधिस्विकृती समितीची बैठक जिल्हा नसलेल्या परंतु जिल्ह्याची क्षमता असलेल्या अंबाजोगाई सारख्या तालुका पातळीवरील गावात घेण्याचा पहिलाच निर्णय या बैठकीत घेण्यात आला.सदरील बैठक ही अंबाजोगाई नगर परीषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात ३ मे रोजी सकाळी १०;३० वाजता सुरु होणार आहे.विवेकसिंधु कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मराठवाडा विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे, वैभव स्वामी, सुदर्शन रापतवार यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीत अ.र.पटेल, अविनाश मुडेगावकर, प्रदीप तरकसे, रमाकांत पाटील, अभिजित गाठाळ, विरेंद्र गुप्ता, दत्ता अंबेकर, दादा कसबे, रणजित डांगे, राहुल देशपांडे, नागेश औताडे, नंदकुमार पांचाळ हे उपस्थित होते.
Add new comment