सीओ साहेब, बुकं छापायलाही पैसे नाहीत का?; जनतेचा सवाल
बीड, (प्रतिनिधी):- येथील नगरपालिकेतील वसुली विभागात गेल्या एक महिन्यापासुन पीटीआर बुक संपल्याने लोकांनो त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. पीटीआर बुक नसल्याने पालिकेचा लाखोंचा महसुलही बुडत आहे. असे असतांनाही मुख्याधिकारी जावळीकर याकडे दुर्लक्ष करत आहेत. तब्बल महिनाभरापासुन पीटीआर बुक छापले जात नसल्याने सीओ साहेब, बुक छापायलाही पालिकेकडे पैसे नाहीत का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
बीड नगरपालिकेत मागील महिन्याच्या १७ तारखेपासुन पीटीआर बुक उपलब्ध नाही. नागरिकांनी पीटीआरची मागणी केली असता पीटीआर बुक संपल्याचे सांगितले जात आहे. वसुलीसाठी किंवा नवीन नाव लावण्यासाठी नागरिक पीटीआरची मागणी करत असुन गेल्या पाच दिवसांपासुन अनेक जण हेलपाटे मारुन परतले. मात्र पीटीआर बुक न मिळाल्याने नागरिकांची न्यायालयासह अन्य ठिकाणची अनेक कामे खोळंबली आहेत. पीटीआर बुक नसल्याचा फटका केवळ नागरिकांनाच बसत नसुन पालिकेचाही लाखोंचा महसुल बुडू लागला आहे. कार्यालयात येणारे नागरिक तेथील कर्मचारी, अधिकार्यांकडे पीटीआर बुक संदर्भात विचारणा करुन थकले आहेत तरीही पालिका प्रशासनाला याचा खेद ना खंत असल्याचे दिसुन येत आहे. लोकांना वेठीस धरण्याच्या प्रकाराने सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे. तब्बल महिनाभरापासुन पीटीआर बुक संपुनही अद्याप त्याची छपाई न झाल्याने सीओ साहेब, बुकं छापायलाही पालिकेकडे पैसे नाहीत का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
Add new comment