लाइव न्यूज़
बीडमधील अनाधिकृत नळ कनेक्शन होणार कट
Beed Citizen | Updated: April 24, 2018 - 2:52pm
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन शोध मोहिम पालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या शोध मोहिमेसाठी नऊ कर्मचार्यांसह वॉलमन व त्यांचे लेबर यांना आदेशित करण्यात आले आहे. शोध मोहिमेची जबाबदारी पी.आर.दुधाळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
बीड पालिकेने अनाधिकृत नळ कनेक्शन धारकाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील प्रत्येक भागात शोध मोहिम राबवून अनाधिकृत कनेक्शन तोडण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत. मंगळवार रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शाहूनगर जलकुंभाचा पुर्ण परिसर, सर्व उपनगरे, श्रीरामनगर, नगरनाका, जलकुंभाचा परिसर, बुधवार रोजी धानोरा रोड जलकुंभाचा पुर्ण परिसर व सर्व उपनगरे, गुरुवारी बिंदुसरा नदीचा पुर्व भाग, बार्शीनाका, इंदिरानगर परिसर व सर्व उपनगरे, शुक्रवारी हिरालाल चौक पेठ बीड पोलिस स्टेशनची उत्तर बाजू, न.प.हद्दीपर्यंत सर्व उपनगरे आदि भागात शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. शोध मोहिमेचे काम युद्ध पातळीवर व्हावे यासाठी प्रमुखपदी पी.आर.दुधाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Add new comment