लाइव न्यूज़
Add new comment
आंबेडकरांनी पीडितांना अधिकार मिळवून दिले -कागदे

बीड, (प्रतिनिधी): अंधश्रध्देच्या खाईत खितपत पडलेल्या दलित- शोषित बांधवांना गुलामीच्या जोखमीतून मुक्त करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करत समाज बांधवांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले, असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीप्रसंगी माळापुरी, भाळवणी, चौसाळा, कोळगांव, सावरगाव (ता.शिरूर) येथे केले. यावेळी राजू जोगदंड, किसन तांगडे, अरूण भालेराव, बापू पवार, सुभाष तांगडे, जि.प. सदस्य शिवाजी पवार, सविता बडे, मधुसूदन खेडकर, सुनिल शिंदे, अन्वर शेख, आनंद सरपते, दादा हरिदास पंढरीनाथ लगड, विलास सोनवणे, प्रकाश मस्के,बाबासाहेब ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
