Add new comment

बीडमध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान; २२ जणांना पकडले

 शिवाजी नगर ठाण्यातील सपोनि.सलीम पठाण, पोउपनि.रामा औटे

व त्यांच्या सहकार्‍यांनी विविध ठिकाणी कारवाई केली. 

 

बीड, (प्रतिनिधी):- सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ खाणार्‍याविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. आज सकाळपासुन २२ जणांना पकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दुपारी उशिरापर्यंत संबंधित २२ जणाविरुद्ध दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरु होती.
बीड जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी सुधीर खिरडकर, पोनि.नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर ठाण्यातील सपोनि.सलीम पठाण, पोउपनि.रामा औटे व त्यांच्या सहकार्‍यांनी शिवाजीनगर हद्दीत विविध ठिकाणी कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या २२ जणांना पकडण्यात आले असुन त्यांना शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.