लाइव न्यूज़
बीडमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल; हवेत गोळीबार
बीड, (प्रतिनिधी):- कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी येथील बसस्थानकाच्या पाठीमागील रस्त्यावर आज दुपारी मॉकड्रिल (रंगीत तालीम) केली. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. एक फैरी झाडून जमावाला कशा पद्धतीने नियंत्रित करता येऊ शकते याची तालीम घेतली. पोलिस उपअधिक्षक सुधीर खिरडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या मॉकड्रिलने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.
बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिसांनी आज मॉकड्रिल घेतले. जमाव एकत्रित झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना संदर्भात केलेल्या रंगीत तालमीत उपस्थित जमावाला दंगल नियंत्रक पथकाने कशा पद्धतीने अडवले. त्यानंतरही जमाव नियंत्रणात न आल्याचे दाखवत एका पोलिस कर्मचार्याने हवेत गोळी झाडली तर अन्य कर्मचार्यांनी गर्दीच्या दिशेने बंदूका रोखल्या. तर काही कर्मचार्यांनी स्ट्रेचरवरुन कल्पनात्मकरित्या जखमी झालेल्या तरुणास रुग्णवाहिकेच्या दिशेने घेऊन गेले. पोलिसांच्या मॉकड्रिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
Add new comment