Add new comment

पांगरीजवळ भीषण अपघात ; चार ठार एक गंभीर

परळी : तालुक्यातील पांगरी जवळ अ‍ॅपेरिक्षा आणि ट्रव्हल्सच्या समोरासमोरील भीषण अपघातामध्ये ४ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. गुरूवारी मध्यरात्री हा अपघात झाला असून जखमी युवकाला उपचारासाठी लातूरकडे हलिवण्यात आले आहे. खासगी ट्रॅव्हल ही नांदेडहून पुण्याकडे निघाली होती तर अ‍ॅपेरिक्षा प्रवाशांना घेऊन पांगरीहून परळीकडे माार्गस्थ होत असताना पांगरी कॅम्पजवळील जुना राजपूत ढाबा येथे ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये पांगरी गावातीलच बन्सी रामभऊ पाचांगे (२४), श्रावण नागोराव पाचांगे (२०), सुशील उत्तम पाचांगे (२१), प्रकाश विलास पंडित (२१) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. यापैकी बन्सी रामभाऊ पाचांगे यांचाच व्हिलेज झाला असून त्यांना १ मुलगा आहे. कामानिमित्ताने हे सर्वजन परळीकडे जात असताना काळाने घाला घातला. तर गंगाधर अशोक पाचांगे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने पांगरी गावात शोककळा पसरली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.