लाइव न्यूज़
जनतेच्या पदरात विकासाचे माप टाकणे हे मी कर्तव्य समजतो -आ.जयदत्त क्षीरसागर
बीड दि.०५(प्रतिनिधी)ः- शहरासाठी दिर्घकालीन दिखाउ नव्हे तर टिकाउ योजना खेचून आणने आणि त्या प्रत्यक्षपणे राबवणे ही सोपी गोष्ट नाही. जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या जनतेच्या पदरात विकासाचे माप टाकणे हे मी कर्तव्य समजतो असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. गुरूवारी सायंकाळी बशीरगंज चौक या ठिकाणी राजुरी वेस ते वंजारवाडी फाटा या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व जिल्हा रूग्णालय ते भाजी मंडई या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फईम सर तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, बशीरगंजची ख्याती खूप मोठी आहे इथे टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज सर्वत्र पसरतो अशा ठिकाणी आज महत्वाच्या कामाचा शुभारंभ होतो आहे. वाढती लोकसंख्या व वाढत्या गरजा लक्षात घेऊन दिखावा किंवा देखावा म्हणून काम करण्याऐवजी टिकाउ कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून आणला आहे. कामे दर्जेदार झाली पाहिजेत याकडेही आपले लक्ष आहे. शहरासाठी जे-जे करता येईल ते करत आहोत. दिर्घकालीन योजना राबवणे गरजेचे आहे म्हणूनच अमृत अटल योजनेसाठी ११४ कोटी रूपये, भुयारी गटार योजनेसाठी १६५ कोटी रूपये तर शहरातील वीजेचे प्रश्न मिटवण्यासाठी ३५ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. लवकरच ज्या ठिकाणी वाढीव वस्त्या आहेत त्या ठिकाणी वीज उपलब्ध
करून दिली जाईल. पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी अमृत अटल योजनेतून ज्या-ज्या ठिकाणी पाईपलाईन व जलकुंभाची गरज आहे ती कामे तातडीने सुरू करावीत अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. सांडपाणी शहराबाहेर नेण्यासाठी जी महत्वाकांक्षी योजना आहे ती लवकरच सुरू होणार असून खास बाब म्हणून राजुरीवेस, वंजारवाडी फाटा आणि बीड बस स्टँड ते साक्षाळपिंप्री हे दोन रस्ते पूर्ण झाले तर शहराला अनेक गावे जोडली जाणार आहेत. तसेच बीडसाठी नवीन बसस्थानकाचा प्रश्न रखडला होता तोही आता मार्गी लागला असून यासाठी १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि बीओटी तत्वावर त्याचे काम सुरू होईल. गप्पा मारणे सोपे असते, लोकांचे मनोरंजनही करता येते मात्र कोट्यावधींच्या योजना आणने सोपे आहे का ? असा सवाल करत आ.जयदत्त क्षीरसागर यांनी थोड्याच दिवसात शहरातील ५ हजार बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव मंजूर होईल असे सांगितले. जनतेसाठी काही देणे लागतो ही भावना ठेऊन आपण कामे करत आहोत असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी आ.जयदत्त अण्णांच्या माध्यमातून शासनाकडून कोट्यावधींचा निधी खेचून आणला आहे. आगामी काळात शहराची गरज लक्षात घेऊन या योजना राबवणार आहोत. तसेच जुना बाजार, मोमीनपुरा या दोनही रस्त्यांची कामे ईद पुर्वी आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर जुना बाजार ते कनकालेश्वर या दगडी पुलाऐवजी त्या ठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मास्टर प्लॅनमुळे शहराती बाजारपेठा फुलल्या आहेत त्यामुळे आगामी काळात सर्व डिपी रस्ते लवकरच सिमेंट कॉंक्रीटचे होतील. बीड व बीड मतदार संघाचा विकास केवळ जयदत्त अण्णाच करू शकतात याची आता जनतेला खात्री पटली आहे. विकासासाठी ज्यांच्यात निधी खेचून आणण्याची कुवत नाही त्यांनी आम्हाला विकास शिकवू नये असे सांगून सर्वांग सुंदर बीडचे स्वप्न साकार करण्याचा आपला संकल्प असल्याचे ते म्हणाले. यावेळी फईम सर, वैजीनाथ तांदळे, ऍड.महेश धांडे, बांधकाम सभापती खालेद, भास्कर जाधव आदिंची भाषणे झाली. यावेळी विलासराव बडगे, अरूणराव डाके, दिलीप गोरे, दिनकरराव कदम, अब्दूल मुखीद लाला, नरसिंहराव नाईकवाडे, सादेक जमा, वैजीनाथराव तांदळे, शेख मतीन शेख चॉंद, किशोर काळे, विष्णू वाघमारे, विनोद मुळूक, सतीष पवार, राणाचौहाण, गणेश वाघमारे, राजेंद्र काळे, जलील पठाण, भिमराव वाघचौरे, शेख शाकेर, ऍड.सय्यद खाजा, ऍड.महेश धांडे, पप्पू जोगदंड, विकास जोगदंड, शेख इलियास, संतोष गायकवाड, शेख जमील, भास्करराव जाधव , शेख मोहम्मद खालेद, शुभम धूत, अमोल बागलाने, सोनू सेठ, सय्यद समी, मोमीन अझहर यांच्यासह नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Add new comment