लाइव न्यूज़
शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली
Beed Citizen | Updated: April 5, 2018 - 3:39pm
बीड (प्रतिनिधी):- जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या विभागीय सचिवपदी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणात शिक्षणाधिकारी राजनोर यांना ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नोटीस बजावली होती. दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून आपणास निलंबित का करु नये? असा खुलासाही मागविण्यात आला होता.
बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना पाटीलबुवा राजनोर यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या विभागीय सचिवपदी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. राजनोर यांच्यासह नांदेड येथील शिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के, अकोला येथील प्रशांत दिग्रसकर यांचीही बदली करण्यात आली आहे. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणावरुन शिक्षणाधिकारी राजनोर यांचे नाव चर्चेत आले होते. ग्रामविकास विभागाने त्याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागवला होता. त्यानंतर चार ते पाच दिवसातच राजनोर यांची बदली झाली असली तरी सदरील बदलीने त्यांना पदस्थापना देण्यात आल्याने त्या प्रकरणाचा बदलीशी संबंध नसल्याचा सुत्रांनी सांगितले.
Add new comment