Add new comment

पत्रकारांमुळे वाचले हरणाचे प्राण

बीड, (प्रतिनिधी):- मोची पिंपळगाव येथे जखमी अवस्थेत असलेल्या हरणाला आज सकाळी पत्रकार संघामुळे जिवनदान मिळाले आहे. जखमी अवस्थेत असलेले हरण रस्त्यावर पडलेले होते. याची माहिती काही नागरिकांनी वन विभागाला दिली मात्र वन विभागाचे त्या ठिकाणी पोहोचले नाही. याची माहिती पत्रकार अमजद खान यांना मिळाल्यानंतर पत्रकार संघाच्या रुग्णवाहिका घेऊन मोची पिंपळगाव येथे जखमी हरणाला घेऊन वन विभाग येथे अमजद खान हे घेऊन आले. याठिकाणी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हा सचिव शेख वसीम, शेख तालेब, शेख आयुब, शाहेद यांनी वन विभागाच्या अधिकार्‍याकडे जखमी हरणाला सुपूर्द केले व पुढील उपचारासाठी हरणाला जनावरांच्या दवाखाण्यात दाखल केले आहे. पत्रकारांच्या या उपक्रमामुळे एका प्राण्याचे प्राण वाचले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.