लाइव न्यूज़
दृष्टीदाता डॉ.तात्यासाहेब लहानेंचे गौरवोद्गार; शिबीरांमुळे रुग्णांना सृष्टी पाहता येईल-आ.क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी) ः- आ.जयदत्त क्षीरसागर म्हणजेे बीडच्या रूग्णांची काळजी घेणारा आमदार आहे. असे गौरवोदगार दृष्टीदाता डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी काढले. या शिबीरासाठी आणि बीडच्या रूग्णांसाठी त्यांनी मला सातत्याने भेटून अखेर हे शिबीर घेतलेच शेवटचा रूग्ण तपासल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. तर वृध्दाअवस्थेत दृष्टी आणि आरोग्य महत्वाचे आहे, खर्च आवाक्याबाहेर चालले आहेत त्यामुळे डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी सुरू केलेल्या अत्याधूनिक शस्त्रक्रीया जगाच्या कल्याणासाठीच असल्याचे प्रतिपादन लोकनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
येथील काकू- नाना प्रतिष्ठानच्या वतीने विठाई हॉस्पिटल जालना रोड, बीड येथे आज गुरूवारी सकाळी १०.०० वाजता मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी व्यासपिठावर पद्मश्री डॉ.तात्यासाहेब लहाने (सहसंचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य), नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ. रागीणी पारीख (नेत्र विभाग प्रमुख जे.जे. रूग्णालय, मुंबई), जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात, नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.के.डी.पाखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, डॉ.श्रीहरी लहाने, विलास बडगे, दिनकर कदम, अरूण डाके, वैजिनाथ तांदळे, गणपत डोईफोडे, संपादक नामदेवराव क्षीरसागर, डॉ.ए.एस.पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व काकू- नाना यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली तर नियोजन समितीच्या पदाधिकार्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलतांना आ. क्षीरसागर म्हणाले की गतवर्षी याच ठिकाणी शिबीर घेण्यात आले अनेक तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले त्यामुळे अनेक पिडीत रूग्णांना मोठा लाभ झाला. सगळ्याच रूग्णांना मुंबईला जाता येत नाही. महागाईच्या काळात खर्च ही आवाक्याच्या बाहेर चालले आहेत. त्यामुळे काकु- नाना प्रतिष्ठाणच्या माध्यमातून हे शिबीर घेवून गरजूंना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजून हे कार्य हाती घेतले आहे. या कार्याला अनेकांचे सहकार्य मिळाले आहे. बीड जिल्ह्यात रूग्णांच्या संख्येत अधिक वाढ होवू लागली आहे. रोगाचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे आता निदान करणारी यंत्रना सुसज्ज ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत उपलब्ध असलेली उपचार पध्दती फायद्याची ठरू लागली आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून जिल्हा रूग्णालयात स्ाुसज्ज ३०० खाटाची पाच मजली ईमारत लवकरच उपलब्ध होणार आहे. अत्याधूनिक शस्त्रक्रीया ही जगाच्या कल्याणासाठी डॉ.लहाने यांनी उपलब्ध करून दिली आहे. आधूनिक तत्रज्ञानाच्या साहाय्याने आता आयुष्य मर्यादा वाढू लागली आहे. प्रत्येकजन दिर्गायुर्षी कसा होईल याचे तंत्रज्ञान विकसीत होवू लागले आहे अशा शिबीरांमुळेच रूग्णांना दिलासा मिळेल आणि चांगल्या दृष्टीतून ही नवी सृष्टी पाहता येईल आगामी काळात हेच शिबीर हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यात घेणात येईल असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलतांना डॉ. तात्यासाहेब लहानेे म्हणाले की मी केवळ आण्णांच्या आग्रहाखातर येथे आलो आहे.बीडच्या रूग्णांची काळजी घेणारा आमदार तुम्हाला मिळाला हे खरोखरच भाग्य आहे. बीडच्या शिबीरासाठी किती तरी वेळा माझ्याकडे येवून आणि आग्रह करून मला येण्यास त्यांनी भाग पाडले. मी देखील तुमचाच आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रूग्ण संख्या असल्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो आणि आधि आपली तपासणी व्हावी म्हणून लोक गर्दी करतात परंतू शेवटचा रूग्ण तपासल्याशिवाय मी आणि माझी टिम येथून जाणार नाही. डोळ्याच्या साध्या ऑपरेशनसाठी तीन हजारापासून ते दहा हजारापर्यत खर्च येतो काकू- नाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी हा सारा खर्च केला आहे. त्यामुळे त्याचा उपयोग व्हावा आणि शस्त्रक्रीया यशस्वी व्हावी यासाठी रूग्णांनी काळजी घ्यावी. बीनटाका शस्त्रक्रीया असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे सांगून त्यांनी उपस्थित रूग्णांना तीन दिवसाच्या उपचार पध्दतीबद्दल माहिती दिली. यावेळी प्रास्ताविक डॉ.श्रीहरी लहाने यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.अरूण भस्मे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश देशमुख यांनी केले.
Add new comment