Add new comment

भवानवाडीत गोठ्याला आग , एक म्हैस दगावली, तीन जखमी.

बीड, (प्रतिनिधी):- तालुक्यातील भवानवाडी येथील एका शेतकर्‍याच्या गोठ्याला  लागलेल्या आगीत एक म्हैस दगावल्याची घटना काल घडली. यासोबतच गोठयाशेजारी असलेल्या कडबा गंजीलाही आगीने वेढल्याने दोन हजारांपेक्षा जास्त कडबा जळून खाक झाला आहे. सदरील शेतकर्‍याचे या घटनेत लाखोंचे नुकसान झाले  आले आहे.  
  भवानवाडी येथील   जगताप यांच्या गोठ्याला काल दुपारी अचानक आग लागली. या आगीत सदरील शेतकर्‍याच्या म्हैशी बांधलेल्या होत्या. यामधील एक म्हैस भाजल्याने जागीच दगावली तर तीन म्हशी किरकोळ भाजल्या आहेत. यासोबतच गोठ्यानजीक असलेल्या कडबागंजीलाही आग लागून  दोन हजारांपेक्षा अधिक कडबा जळून खाक झालेला आहे. सदरील घटनेत आग कशामुळे आग लागली हे अद्याप समजले नसून महसूल प्रशासनाकडून याचा पंचनामा करण्यात आला असल्याचे समजते

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.