लाइव न्यूज़
एकाच दिवशी २२५ रूग्णांवर नेत्र शस्त्रक्रीया आ.जयदत्त क्षीरसागरांच्या हस्ते चष्मे वाटप
बीड,(प्रतिनिधी) ः- रूग्ण हा डॉंक्टराकडे देव रूपात पाहात असतो डॉक्टर लहाने व त्यांच्या टिमने डोळ्याची दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेले काम हे अनमोल असून त्याचे मोल होवू शकत नाही. नजर चांगली होवून नेत्र रूग्णांनी जगाकडे चांगल्या दृष्टीने पहावे येवढीच माफक अपेक्षा आहे. डॉ.लहाने यांच्या हातून हे काम अव्याहतपणे चालू रहावे जेणे करून अनेकांना चांगल्या दृष्टीने नवि श्रृष्टी पहाता येईल असे सांगून आ.क्षीरसागरांनी पुढील नेत्र शिबीर हे येत्या २२ ते २६ नोव्हेंबर २०१८ दरम्यान पुन्हा घेण्याची घोषणा केली.
शुक्रवारी जालना रोड वरील विठाई हॉस्पिटल येथे काकू- नाना प्रतिष्ठानच्या वतीने चालू असलेल्या मोफत नेत्र शस्त्रक्रीया शिबीरात नेत्र शस्त्रक्रीया झालेल्या रूग्णांना आ.क्षीरसागर यांच्या हस्ते चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ.क्षीरसागर म्हणाले की जग हे सुंदर आहे आणि ते प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी चांगल्या दृष्टीची गरज असते पण वाढत्या वयामुळे किंवा दृष्टीदोषामुळे काहींना ही श्रृष्टी पाहता येत नाही पण पद्मश्री डॉ.लहाने व त्यांच्या सर्व टिमने दृष्टीदोष असलेल्या रूग्णांची अथक सेवा करून नव्याने ही अनमोल दृष्टीला सुंदर श्रृष्टी पाहण्याचा संकल्प केला असून काकू- नाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा माणून नेत्र शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे नेत्र शिबीर शेवटचा रूग्णांची तपासणी होई पर्यत चालणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
Add new comment