लाइव न्यूज़
मावेजासाठी शेतकर्याचे अमरण उपोषण
बीड, (प्रतिनिधी):-धारूर तालुक्यातील नागझरी गायमुख येथील शेतकरी बाबासाहेब कोडींबा मुरकुटे हे जिल्हा कचेरीसमोर मावेजाची रक्कम देण्यात यावी यामागणीसाठी अमरण उपोषणास बसले आहेत.
मौजे नागझरी गायमुख येथील जमीन सर्वे नं.११,१६,२१,४३/२/२/३ मधील एकुण १२ एक्कर जमीन आणि ४३ मधील सिमेंट क्रॉकीटने बांधलेली एक विहीर, दोन घरे, जनावरे बांधण्याचे गोठे ही संपुर्ण मालमत्ता इ.स.१९७५-७६ ला कुंडलिका येथील प्रकल्पामध्ये गेलेली आहेत. ही जमीन बागायती होती. या जमीनीमध्ये ऊस, कापुस, आर्दक, गहू, ज्वारी, ङ्गळझाडे आदी होती. सदरील जमीनीचा मावेजा मिळण्यासाठी मी सतत विनंती अर्ज केले असून मला ४ कोटी ५० लाख रूपयामधून ङ्गक्त १२ हजार रूपयेच मिळाले असल्याचे निवेदनात शेतकर्याने म्हटले असून मला मावेजाची उर्वरित रक्कम देण्यात यावी यामागणीसाठी बाबासाहेब कोडिंबा मुरकुटे हे अमरण उपोषणास बसले आहेत.
Add new comment