लाइव न्यूज़
लाचलुचपत अधिकारी शेळके यांना आज कोर्टात हजर करणार
Beed Citizen | Updated: March 23, 2018 - 3:10pm
बीड, (प्रतिनिधी):- पुरवठा अधिकारी नरहरी रामभाऊ शेळके आणि कारकुन बब्रुवाहन परमेश्वर फड यांना काल लाचलुचपत प्रतिबंधक कर्मचार्यांनी १ लाख १५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना पकडले. या प्रकरणी आज पुरवठा अधिकारी शेळके यांना न्यायाधीश वाघ यांच्या कोर्टात हजर करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
स्वस्त धान्य दुकानात होत असलेल्या गैरव्यवहाराबाबत सदरील दुकानाची चौकशी करुन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. सदरील प्रकरणाची सुनावणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समोर सुरु होती. निकाल बाजूने देण्यासाठी पुरवठा अधिकारी शेळके व कारकुन फड यांनी दोन लाख रुपयांची लाच मागण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रारदाराने दिल्यावरुन पुरवठा अधिकारी शेळके आणि कारकुन फड यांना १ लाख १५ हजार रुपये पकडल्या प्रकरणी आज कोर्टात हजर करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
Add new comment