खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

ऍड.कृष्णाराव सयाजीराव पंडित
बीड, (प्रतिनिधी):- रिक्षा चालकाचा २०१२ रोजी कपिलधार परिसरात खून होऊन जांबुवतगड ता.अंबड जि.जालना येथे मृतदेह टाकण्यात आला होता. या प्रकरणी राहूल झनझने यांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपातून सुरेश मोरे व इतर तीन आरोपींची प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली.
या बाबत अधिक माहिती अशी की, सचिन झनझने हा ऍटोरिक्षा चालक नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत असतांना कपिलधार येथे रिक्षा घेऊन गेला. परंतु रात्री उशिरापर्यंत न आल्याने सचिनचे वडिल उत्तम झनझने यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सचिनच्या ओळखीचे लोकांनी तीन लोकांनी रिक्षा भाड्याने घेत कपिलधार येथे घेऊन गेल्याची माहिती पुढे आली होती. दि.८/७/२०१२ रोजीपासुन सचिन बेपत्ता होता. परंतु दि.१५ रोजी सचिनचा मृतदेह जांबुवतगड ता.अंबड जि.जालना येथील टेकडीवर सापडला. या प्रकरणात मयत सचिनची भावजयी स्वप्ना झनझने यांचे आरोपी सुरेश मोरे याच्यासोबत दोन वर्षापासुन अनैतिक संबंध होते. या संबंधामध्ये सचिन झनझने अडथळा येत असल्याने त्याचा खून केल्याचा आरोप सचिनचा भाऊ राहूल झनझने यांनी केला होता. त्या प्रकरणी कलम ३०२, ३६४, २०१, १२० (बी) सह ३४ प्रमाणे सुरेश मोरे, स्वप्ना झनझने, सय्यद आशिक रसूल, शेख रिजवान रहीम, शेख समीर हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास पुर्ण होऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातून पुढे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. एकुणया प्रकरणात २२ साक्षीदार सरकारी पक्षातर्फे तपासण्यात आले. दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकत न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. प्रमुख आरोपी सुरेश व शेख समीर यांच्यावतीने ऍड.कृष्णाराव सयाजीराव पंडित यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य ऍड.एस.जी.शेख, ऍड.राधाकृष्ण पंडित, ऍड.अमीत चौधरी, ऍड.अमोल दाभाडे, ऍड.नंदकुमार जोशी यांनी सहकार्य केले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.