लाइव न्यूज़
नेकनूरकरांचेही शुभकल्याण दिलीप आपेटसह तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Beed Citizen | Updated: March 24, 2018 - 2:30pm
बीड, (प्रतिनिधी):- आपेट यांच्या शुभकल्याण मल्टीस्टेटने ठिकठिकाणच्या ठेवीदार ग्राहकांची फसवणूक केल्यानंतर आता आपेट यांनी नेकनूरकरांचेही शुभकल्याण केल्याचे समोर आले आहे. वानगाव येथील शेतकर्याने दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप आपेटसह २३ जणांविरुद्ध नेकनूर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बीड तालुक्यातील वानगाव येथील शेतकरी मारोती बाबुराव जोगदंड (८०) यांनी नेकनूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिलीप बाबुराव आपेट, अभिजीत दिलीप आपेट, अजय दिलीप आपेट, विजय दिलीप आपेट, शालिनी दिलीप आपेट, भास्कर बजरंग बिराजदार, कमलबाई बाबासाहेब नखाते, प्रतिभा आप्पासाहेब आंधळे, नागिनीबाई बजरंग शिंदे, आशाबाई रामराव बिराजदार, बापुराव ज्ञानोबा सोनकांबळे, चत्रभुज आसाराम तळेकर, शाम महादेव रोडे, राजेंद्र भिमराव ठोंबरे, विनोद लक्ष्मण दळवे, प्रदिप सुभाष काचमांडे, वाघमोडे, पठाण, बळीराम लहुराज लोकरे, शिवाजी भानुदास गिरी, सादिक, रमेश बहिरे, वल्लभ आदि २३ जणांनी शुभकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी नावाची पतसंस्था तयार करुन लोकांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेव्या स्विकारल्या व सदर ठेवीच्या रक्कमेत अपहार केला. ठेवीदारांच्या ठेवीच्या व्याजाची रक्कम न देता परस्पर वेगवेगळ्या कंपन्या, साखर कारखाने तयार करुन सदरील रक्कम बेकायदेशिरपणे वळवून फसवणुक केली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी गाडे हे करत आहेत.
Add new comment