बीडमध्ये ८ एप्रिलला हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन
बीड, (प्रतिनिधी):- आज हज यात्रा, मदरसे आणि चर्च यांना अर्थसहाय्य मिळते, अहिंदूंना अल्पसंख्यांक म्हणून विविध सुविधा दिल्या जातात पण बहुसंख्यांक हिंदूंना काय मिळते? हिंदूंच्या मंदिरावरील आक्रमणे, यात्रांवरील कर आदिंचे प्रमाण वाढत आहे. गोमातेची हत्या राजरोसपणे होत आहे. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. हिंदूंची धर्मांतरे थांबत नाहीत, या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हिंदू जनजागृती समिती गेल्या १५ वर्षापासुन राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यासाठी अखंड कार्यरत असुन आजवर समितीच्यावतीने देशभरात हजारो सभांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत बीड येथे ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल (स्टेडियम) येथे जाहीर हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीच्यावतीने आज पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली. या सभेत मान्यवर वक्त्यांमध्ये सर्वांचे मुख्य आकर्षण असलेले भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक आणि भाजपचे आ.टी.राजासिंह, सनातन संस्थेच्या संत सदगुरु (कु.) स्वाती खाड्ये, हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव जिल्हा समन्वयक मनोज खाड्ये, हिंदू विधीज्ञ अधिवक्ता निलेश सांगोलकर ज्वलंत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मनोज खाड्ये यांनी येथील दत्त मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वेदशास्त्र संपन्न धुंडीराज शास्त्री पाटंगणकर, बीड शहर भाजप नगरसेवक जगदिश गुरखूदे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वप्निल गलधर, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेते राणासिंह चौहान, महेश धांडे यांची उपस्थिती हो. या सभेला हिंदूनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन हिंदू जागृती समितीच्यावतीने करण्यात आले.
Add new comment