मोमीनपुरावासियांचे आठ महिन्यांपासुन हाल; कामासाठी पुढाकार घेणारे शेख निजाम गप्प का?

नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांच्या भुमिकेविषयी लोकांमध्ये संताप
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील मोमीनपुरा, अशोकनगर रस्ता रुंदीकरणाचा प्रश्‍न आठ महिन्यांपासुन रखडला आहे. रस्त्यावरील खाच-खळगे, दगड-गोट्यातून चालण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली आहे. आठ महिन्यांपासुन नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असुनही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कामासाठी पुढाकार घेणारे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम गप्प का? असा सवाल या भागातील लोकांमधुन उपस्थित होत असुन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या भुमिकेविषयी देखील संताप व्यक्त होवू लागला आहे. दरम्यान ७ जुलै २०१७ रोजी मुख्याधिकार्‍याने जाहीर प्रगटनाद्वारे ४० फुटापर्यंतचे रस्ता रुंदीकरण होत असल्याचे सांगुन अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. नंतर मात्र त्यांनीच १९ जुलै रोजी सारडा कन्स्ट्रक्शनला नोटीस पाठवून काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यावरुन लोकांमध्ये संभ्रम असुन पालिका प्रशासनाने आपली भुमिका स्पष्ट करावा अशी मागणी होवू लागली आहे.
बीड शहरातील मोमीनपुरा, अशोकनगर, बार्शीनाका रस्ता रुंदीकरणाच्या कामाला जुलै २०१७ मध्ये कामाला सुरुवात झाली होती. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी या कामासाठी पुढाकार घेत नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्यासह मोमीनपुरा भागात स्वत: फिरुन लोकांना अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. या संदर्भात दि.७ जुलै २०१७ रोजी मुख्याधिकार्‍यांनी जाहीर प्रगटनाद्वारे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाल्याचे स्पष्ट करत ४० फुटाच्या रस्त्याची जागा रिकामी करण्याचे आवाहन केले होते. अतिक्रमण न काढल्यास पोलिस बंदोबस्तात ते हटविण्याची तंबीही दिली होती. शेख निजाम यांच्यासह नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी स्वत: अतिक्रमण काढले. मात्र अवघ्या १२ दिवसातच मुख्याधिकार्‍यांनी माघार घेत सारडा कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावून सदरील कामासंबंधी कार्यारंभ आदेश व टेंडर संबंधी कागदपत्रे कार्यालयात दाखल न केल्याने काम थांबविण्याचे आदेश दिले होते. पालिका प्रशासनातील असमन्वय पाहून त्या भागातील नागरिकांनी अतिक्रमण काढण्याचे काम थांबवले. दरम्यानच्या काळात त्याठिकाणच्या रस्त्यावर मुरुम, खडी टाकण्यात आली ती आजही आहे त्याच अवस्थेत आहे. चांगल्या रस्त्यावर दगड-गोटे टाकण्यात आले. मागील आठ महिन्यांपासुन रस्त्याची जैसे थे अवस्था असुन महिला, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत.
 
बीडमध्ये सर्वत्र विकासाची जंत्री मग मोमीनपुर्‍याला वाळीत टाकले की काय?
बीड शहरामध्ये नगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेतली आहेत. विविध रस्त्यांचे रुंदीकरण, नाली बांधकाम केले जात असुन शहराला डिजीटल लुक देण्याचा प्रयत्न केला जात असतांना मोमीनपुरा, अशोकनगर, बार्शीनाका या रस्त्याच्या रुंदीकरणप्रश्‍नी दुर्लक्षीत का? असा प्रश्‍न उपस्थित करत पालिकेने आम्हाला वाळीत टाकले की काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
 
जावळीकर साहेब ‘त्या’ जाहीर प्रगटनाचे काय?
बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी ७ जुलै २०१७ रोजी कुरेशी मोहल्ला, मोमीनपुरा, अशोकनगर, बार्शीनाका येथील तमाम जनतेस जाहीर प्रगटनाद्वारे सूचित केले होते. सदरील रस्ता ४० फुट रुंदीचा असुन त्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. रुंदीकरणास १ ते ५७ लोकांनी संमती दिलेली असुन उर्वरीत लोकांनी दोन दिवसात ४० फुटाच्या रस्त्याची जागा रिकामी करुन अतिक्रमण काढावे असे आवाहन केले होते. सदरील जाहीर प्रगटनाला आठ महिने उलटले तरीही त्या रस्त्यावरील काम  तर सोडाच दगडही हलले नाही. त्यामुळे सदरील जाहीर प्रगटनाचे काय? असा सवाल या भागातील नागरिक विचारु लागले आहेत.
 
एमआयएमचे उपोषण, ईशाराही ठरला फार्स
एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनी मोमीनपुर्‍यातील काम सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सदरील काम होत नसल्याने महिनाभरापुर्वीच पालिकेतील एमआयएमच्या गटनेत्यांनी त्यांच्या काही नगरसेवकांना सोबत घेऊन पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्याचवेळी मुख्याधिकार्‍यांनी उपोषणस्थळी येऊन १५ दिवसात प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते तसेच एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनीही नगराध्यक्षांची भेट घेऊन काम तात्काळ सुरु न केल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा दिला होता. मात्र त्यांचे उपोषण, ईशाराही फार्स ठरल्याची चर्चा लोकांमध्ये होवू लागली आहे.
लोकांना फिरुन केलेल्या अवाहनाचे काय?
.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.