लाइव न्यूज़
भिडेच्या अटकेसाठी भारिपचा जिल्हाभर घंटानाद
बीड,दि.३(प्रतिनिधी)ः-भिमा कोरेगाव येथे हिंसाचार घडवून आणणारा मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्ङ्ग संभाजी भिडे याला तात्काळ अटक करावी. या मागणीसह अन्य मागण्या हाती घेत संविधानिक मार्गाने भारिप बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर आज घंटानाद आंदोलन करीत गेड्यांची कातडी पांघरलेल्या सरकारचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला.
भारिप बहूजन महासंघाच्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्तेत जावून बसलेलेल्या विषमतावादी पक्षांनी बहूजन समाजाचे पुरते वाटोळे करून टाकले आहे. या सरकारने बहूजनांच्या हिताचा एकही चांगला निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बहूजन समाज देशोधडीला लागला आहे. भिमा कोरेगाव घटनेतील संभाजी भिडे हा पहिल्या क्रमांकाचा आरोपी असतानाही त्याला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. कायदा हा सर्वांना समाना आहे, मग सरकार भिडेला अटक करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला का देत नाही. दंगल घडवून आणणार्या भिडेची सरकार का पाठराखण करीत आहे. आदरणीय ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आपणास आठ दिवसांची डेडलाईन दिलेली आहे. असे असतानाही जर का भिडेला अटक झाली नाही तर भारिप पुन्हा आंदोलनाचा बडगा उचलल्याशिवाय राहणार नाही. निवेदनात असेही म्हटले आहे की, बीडमध्ये धम्मानंद वाघमारे, गेवराई रविंद्र पाटोळ,परळी परमेश्वर लांडगे, वडवणी चरणराज वाघमारे, धारूर इंजि.प्रशांत उघडे, सचिन गायसमुद्रे, माजलगाव धम्मानंद साळवे, अंबाजोगाई मारोती सरवदे, आष्टी अनिल साळवे, पाटोदा सचिन मेघडंबर, केज बाबासाहेब मस्के, सम्यकविद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा महासचिव प्रकाश उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदारांना निवेदने देण्यात आली.या घंटानाद आंदोलनामध्ये अजय सरवदे, अजय साबळे, संघर्ष पंडित, मिलिंद हराळे, ज्ञानेश्वर कवठेकर, माणिक वाघमारे, गोविंद पाटेकर, अड.अशोक शेठे, शिवा थोरात, दिपक बनसोडे, सदानंद वाघमारे, संतोष जोगदंड, विशाल सुर्यवंशी, तुरूंकमाने, वाघमारे यांच्यासह भारिप पदाधिकारी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Add new comment