बीडमध्ये अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरील किचन गॅलरीतून खाली पडल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विद्यानगर पुर्व भागात घडली.
बीड शहरातील विद्यानगर पुर्व भागात करिश्मा निलेश खंडारीया (१३) ही मुलगी आज सकाळी  अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरील घराच्या किचनमध्ये काम करत होती. गॅलरीतून अचानक ती खाली पडल्याची घटना पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असतांना सकाळी ७ वाजता तिची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असुन एैन सणाच्या दिवशीच सदरील घटना घडल्याने कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.