लाइव न्यूज़
भाग्य नगर व जिजाऊ नगर मधील गार्डनचे काम प्रगतीपथावर नगराध्यक्षांनी केली कामाची पाहणी
बीड, (प्रतिनिधी):- शहरामध्ये हरितक्षेत्र विकास योजनेअंतर्गत छोटया छोटया उद्यानाची कामे सुरू असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. भाग्य नगर आणि जिजाऊ नगर याठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी संबंधीतांना योग्य त्या सूचना दिल्या. ही कामे प्रगतीपथावर असल्यामुळे येथील नागरकीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बीड शहरामध्ये हरितक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नगर पालिकेच्या मोकळ्या जागामध्ये लहान लहान उद्यानाची उभारणी केली जात आहे. परिसरातील नागरीकांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी सुरू असलेल्या उद्यानामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. जेष्ठ नागरीकांना असन व्यवस्था, जॉकीग ट्रॅक, लहान मुलांना खेळ्ण्यासाठी मोकळी जागा आणि विविध वृक्षाची लागवड करून सुशोभिकरण आदी कामे सुरू आहेत. दोन्ही भागात सुरू असलेल्या गार्डनच्या कामाची पाहणी करून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी या भागातील नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरू असलेल्या कामाबाबत नागरीकांनी समाधान व्यक्त व नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक भिमराव वाघचौरे, रत्नाकर कुलकर्णी, माजी न.से. ऍड.महेश गर्जे, ऍड.जे.टी.महाजन, डॉ. सुहास देशपांडे, विलास लोकरे, सोनार सर, कुबडे काका, प्रसन्ना कुलकर्णी, डॉ.नाईकवाडे, व जिजाऊ नगर मधील नगरसेवक रविंद्र कदम, गणेश वाघमारे, बाळासाहेब इंगोले, मदन नाईक, गोरख जाधव, विठ्ठल जोगदंड, अभिनय रोहीटे, दिपक घुमरे, प्रविण सुरवसे, गणेश भोसले, तिडके, काळकुटे आदींसह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपिस्थत होेते.
Add new comment