लाइव न्यूज़
दिंद्रुडजवळ नववर्षदिनीच रक्तरंजित राडा पाण्याचा वाद विकोपाला; कुर्हाडीने हल्ला; दोघे गंभीर जखमी
बीड, (प्रतिनिधी):- कॅनॉलमधुन पाणी घेण्याच्या कारणावरुन दोन गटातील वाद उफाळून आल्याने एका गटाने दुसर्या गटातील लोकांवर कुर्हाडीने हल्ला केल्याची घटना दिंद्रुडजवळील उमरी येथे आज सकाळी घडली. यामध्ये दोघे जण गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडजवळील उमरी येथे आज सकाळी दोन गटातील वाद उफाळून आला. कॅनॉलमधुन शेतीसाठी पाणी घेण्याच्या कारणावरुन दोन गट समोरासमोर भिडले. यावेळी एका गटाने दुसर्या गटातील लोकांवर कुर्हाडीने हल्ला केला. त्यामध्ये शिवाजी धायतिडक आणि राजाभाऊ धायतिडक हे दोघे गंभीर जखमी झाले असुन एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सुत्रांनी सांगितले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी रवाना झाले असुन दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान नववर्षदिनीच दोन गटातील वाद उफाळून आल्याने झालेल्या रक्तरंजित राड्यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे.
Add new comment