Add new comment

अनुदानप्रश्‍नी निराधारांचा तहसिलसमोर ठिय्या घोषणाबाजीने तहसिल प्रशासन दणाणला

बीड, (प्रतिनिधी):-गेल्या वर्षभरापासून निराधारांच्या रखडलेल्या अनुदानप्रश्‍नी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निराधारांनी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केल्याने तहसिल परिसर दणाणून गेला होता. आमचे प्रश्‍न मार्गी लावा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा यावेळी निराधारांनी देवून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले. 
अंगठा उमटत नसल्याने १३८७ निराधार आपल्या पगारीपासून वंचित राहिले आहे. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन, आंदोलन करूनही प्रशासन जागे झाले नाही. त्यामुळे आज तहसिल कार्यालयासमोर निराधारांनी ठिय्या मांडून तहसिलदार यांना आपल्या मागण्या कळविल्या आहेत. जोरदार घोषणाबाजी करून निराधारांनी आपले प्रश्‍न प्रशासनापर्यंत पोहचविले आहेत. तहसिलदार शिंगटे यांनी तुमच्या मागण्या मान्य होतील असे आश्‍वासन दिल्यामुळे निराधारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या आंदोलनात दिलीप भोसले यांच्यासह शेकडो निराधार सहभागी झाले होते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.