Add new comment

बहीणीची गावात भावाची आत्महत्या

बीड,(प्रतिनिधी):- आजारी असल्याच्या कारणाने बहीणीकडे रहायला गेलेल्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नागझरी येथे घडली आहे. महादेव माने (३६) असे या तरुणाचे नावे असून त्याने गुरूवारी सकाळी १० च्या दरम्यान बहीणीच्या घरातील आडूला गळफास घेऊन जीवन संपिवले आहे. महादेव माने यांचे मुळ गाव करचुंडी (ता.बीड) हे असून जवळ असलेल्या नागझरी येथे त्यांच्या गयाबाई गायकवाड व जमुनाबाई शेटे या दोन्ही विवाहीत बहीणी राहत आहेत. मध्यंतरी महादेव माने  हे बरेच दिवस आजारी होते. त्यामुळे सध्या ते पत्नी आणि मुला-बाळासह नागझरी येथे बहीणीकडे राहत होते. गुरवारी सकाळी महादेव माने यांची बहीण जमुनाबाई, पत्नी व मुले ही जवळच असलेल्या गयाबाई शामराव गायकवाड यांच्या घरी गेले होते. त्यामुळे घरात कुणी नसल्याचे पाहून महादेव माने यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. असत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.