लाइव न्यूज़
अंगणवाडी सेविकांना मेस्माच्या कक्षेत आणणार
Beed Citizen | Updated: March 17, 2018 - 3:33pm
मुंबई, (प्रतिनिधी):- भाजप सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाचा धसका घेतला असून अंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि कर्मचार्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या अर्थात मेस्माच्या कक्षेत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
भाजप सरकारची ही जुलूमशाही ब्रिटिश सरकारला लाजवेल अशी असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांकडून व्यक्त केली जात आहे. वेळेवर मानधन न मिळणार्या अंगणवाडी सेविकांची जगण्याचीच मारामार असताना ’मेस्मा’ जाहीर करून सरकार अंगणवाडी सेविकांनाही आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी केला आहे.
--
Add new comment