Add new comment

कारागृहातील दोन कैद्यांविरूध्द गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी): संगनमत करून कारागृहातून पळून जाण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन कैद्यांविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला तर दुसर्‍याने त्यास मदत केल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला आहे.
बीड शहरातील कारागृहातून ज्ञानेश्‍वर जाधव हा काल पळून गेला होता. त्यास तात्काल पकडण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हा कारागृहाचे प्रकाश मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्‍वर बालाजी जाधव व विकास मदन देवकते दोघांनी संगनमत करून पळून जाण्याचा कट रचला. ज्ञानेश्‍वर जाधव हा पळून गेला तर विकास देवकते याने त्यास मदत केली म्हणून दोघांविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.