Add new comment

भास्कर चोपडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बीड, (प्रतिनिधी):- पुण्यनगरीचे बीड जिल्हा प्रतिनिधी भास्कर चोपडे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात शुक्रवारी सकाळी ११ वाजता भगवान बाबा प्रतिष्ठानजवळील  स्मशानभूमीत अंत्यस्कार करण्यात आले. गुरूवारी सायंकाळी त्यांचे औरंगाबाद येथे उपचार घेत असताना निधन झाले होते. 
पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी जिल्हाभरातून पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय क्षेत्रातील नेते असा मोठा समुदाय उपस्थित होता. चोपडे कुटुंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.