लाइव न्यूज़
अंगणवाडी ताईचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षच ठेवा-दिलीप भोसले
बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील अंगणवाडी मधील काम करणारे मदतनीस व सेविका यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे वरुन ६० वर्षे केले आहे तसाच निर्णय राज्य सरकारने वेतन श्रेणी कोणतीही द्यावी पण त्यांना शासकीय सेवेत घ्यावे व महाराष्ट्रातील तेरा हजार मदतनीस व सेविका ह्या निवृत्त होत आहे. त्यांना स्वेच्छा निवृत्ती म्हणून ५ वर्षाचे मानधन पगार देर्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य संघर्ष अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
काल मेस्मा कायदा हा अंगणवाडी मदतनीस सेविका यांना लागु करण्याचा निर्णय शासन घेत आहे. तर दुसरीकडे त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून संबोधण्यात येईल. अशी परिपत्रक सुद्धा शासनाकडून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०१७ अन्वये आदेश काढण्यात आलाआहे. त्यासंदर्भात शासनाने जसा हा आदेश काढला तसाच आदेश शासकीय सेवेत घेण्याच्या संदर्भात काढण्यात यावा. जर सगळे आदेश अंगणवाडी कर्मचार्यांना राज्य सरकारच्या कर्मचार्यांप्रमाणे निघत असतील तर मग शासकीय सेवेत घेण्याचा आदेश का निघत नाही. असा प्रश्न सुद्धा निवेदनात विचारण्यात आला आहे.
येणार्या काळात सरकारने जो निर्णय घेतला त्या निर्णयांतर्गत जे कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यांना स्वेच्छा निवृत्तीचा लाभ ५ वर्षापर्यंतचा देण्यात यावा व जे कर्मचारी सेवेत आहेत त्यांना शासकीय सेवेत घ्यावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असुन या संदर्भात निर्णय झाला नाही तर हायकोटाचा दरवाजा ठोठावला जाईल असेही त्यांनी सांगितले.
Add new comment