Add new comment

ग्रामपंचायत बांधकामाच्या कारणावरून जिल्हा परिषद सीईओंच्या कार्यालयासमोर वृध्दाने अंगावर रॉकेल ओतून घेतले

बीड, (प्रतिनिधी): वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायत बांधकामाच्या कारणावरून एका ६० वर्षीय वृध्दाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी अच्युत निपटे या वृध्दा विरूध्द शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि. १५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अच्यूत बाबुराव निपटे (वय ६० वर्षे), संतराम ताराचंद घुमरे (वय ३६ वर्षे) पिंपरखेड, ता. वडवणी यांनी संगनमत करून ग्रामपंचायत बांधकामाच्या कारणावरून सीईओ यांच्या कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार भागिनाथ नागरगोेजे यांच्या फिर्यादीवरून अच्यूत निपटे, संतराम घुमरे या दोघांविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पो. हे. कॉ. वळवी हे करित आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.