लाइव न्यूज़
Add new comment
तांबाराजूरीत शेतकर्याची आत्महत्या
Beed Citizen | Updated: March 15, 2018 - 2:59pm
पाटोदा, (प्रतिनिधी):- तालुक्यातील तांबाराजूरी येथील शेतकर्याने स्व:ताच्या शेतामधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विष्णू दिगांबर तांबे (५५) असे या शेतकर्याचे नाव आहे. शेतामधील कामानिमित्ताने विष्णू तांबे हे शेतातच राहत होते. नापिकीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. बीट अंमलदार सुभाष मोटे हे घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल असा परिवार आहे.
