पत्रकार भास्कर चोपडे यांचे निधन
बीड (प्रतिनिधी): येथील ज्येष्ठ पत्रकार भास्कर लक्ष्मणराव चोपडे (५०) यांचे गुरुवारी रात्री ९ वाजता औरंगाबादेतील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये निधन झाले़ मागील तीन आठवड्यांपासून पत्रकार भास्कर चोपडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते़ त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि़ १६) सकाळी १० वाजता भगवानबाबा प्रतिष्ठानजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़
मागीन तीन दशकांपासून ते पत्रकारितेत कार्यरत होते़ त्यांनी औरंगाबाद येथून पत्रकारितेची सुरुवात केली़ तब्बल १६ वर्षे ते 'एकमत'चे बीड जिल्हा प्रतिनिधी राहिले़ त्यानंतर २०१० ते १७ या कालावधीत त्यांनी 'सोलापूर तरुण भारत'मध्ये बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले़ ऑक्टोबर २०१७ पासून ते 'पुण्यनगरी'चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते़ येथील बलभीम महाविद्यालयात पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली़ या माध्यमातून त्यांनी अनेक विद्याथ्र्यांना घडविले़ पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्य शासनासह सामाजिक संस्थांनीही गौरविले़ सामाजिक कार्यातही ते हिरीरीने पुढाकार घेत़ लेखणीच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले़ त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेत कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे़ त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता शहरातील बार्शी रोडवरील भगवानबाबा प्रतिष्ठानजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, भावजय, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़ चोपडे परिवाराच्या दुःखात सिटीझन परिवारा ही सहभागी आहे.
Add new comment