लाइव न्यूज़
माझा पक्ष माझा अभिमान माझा स्वाभिमान -ना.पंकजाताई मुंडे
नांदेड (प्रतिनिधी):-,भारतीय जनता पक्ष हा एक कुटुंब आहे. हा काही कुटुंबाचा पक्ष नाही. आज जे काही भारतीय जनता पक्षाचे विराटरूप हा देश हे जग बघत आहे हे तुमच्या सारख्या कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ आहे.माझा पक्ष माझा अभिमान माझा स्वाभिमान आहे ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात असल्याच्या भावना ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.
भारतीय जनता पार्टीचा 6 एप्रिल रोजी स्थापना दिवस या निमित्त मुबई येथे महा भाजपा- महसंगम होणार असुन या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मराठवाडा विभागाची बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी ना. पंकजाताई मुंडे, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, ना. संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास व उद्योजगता राज्य मंत्री, आ. सुजितसिह ठाकूर, सरचिटणीस, महाराष्ट्र यांच्यासह व्यासपीठावर सर्व जिल्हा जिल्हाध्यक्ष, आमदार, विभागीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ना.पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, अनेक कार्यक्रम,अनेक उदघाटन आमच्या हातून हॊतात.सभा होतात,गर्दी होते पण या बैठकीला येतांना खुप आनंद आणि उत्साह वाटत होता कारण या पक्षच्या कार्यक्रमात कार्यकर्ते यांच्याशी भेटता येते, संवाद होतो.
पक्ष्याची कोणतीही बैठक बुडवायची नाही अशी शिकवण लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी मला दिली आहे. त्यामुळे पक्षाचा कोणताच कार्यक्रम मी सोडत नाही.
1980 साली स्थापना पक्षाची स्थापना झाली तेव्हा मी 8 महिन्याची होते त्या वेळी पासून मी पक्षाची कार्यकर्ती आहे. हा पक्ष नाही तर हे माझं कुटुंब आहे हे कस सुरक्षित राहील याचाच प्रयत्न आम्ही आणि तुम्ही करत आहोत.सत्तेच्या माध्यमातून काय योजना केल्या हे सांगण्याचा हा मंच नाही तर
ज्यांच्या मुळे या योजना करता आल्या त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे.असे सांगत या कार्यक्रमाला राज्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येणार आहेत परंतु बीड जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी सांगितले त्या प्रमाणे कार्यकर्ते येणार आहेत. एकदा जाहीर केले की ते आम्ही पूर्ण करतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्ही आज चागले काम का करू शकतो ते तुमच्या बळावर पार्टी हा परिवार आहे. परिवाराचा पक्ष नाही पक्ष्याच्या बैठकीत मन मोकळं बोललं पाहिजे.त्यामुळं मी बोलत आहे
21 राज्यात आपलं सरकार आहे, आतापर्यंत कुणालाही हा विजय मिळवता आला नाही।
आता हे त्यामुळं मी बोलत आहेआता आपल्याला हे टिकवून ठेवायचे आहे. त्यामुळे महा संगम कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.ना. संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास व उद्योजगता राज्य मंत्री,यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
बैठकीस विभागातील सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, प.स.सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment