Add new comment

जवाहर कॉलनीत महिला पोलिसाचे तर सावतामाळी चौकात शिक्षकाचे घर फोडले

दागिण्यांसासह लाखोंचा ऐवज लंपास
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील जवाहर कॉलनी आणि सावतामाळी चौक परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये रात्रीच्या दरम्यान घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही ठिकाणी डिवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह स्थानिक पोलिसांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला आहे. या घरफोडीत सोन्यांच्या दागिण्यांसह हजारोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
नगर रोडवर लगत असलेल्या जवाहर कॉलनीमध्ये महिला पोलिस कर्मचारी जयश्री नरवडे यांच्या घरी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. अक्षरक्ष: दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील २२ इंच टिव्ही, सोन्याचे गंठण आणि ६७ हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनास्थळी डिवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह स्थानिक पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला आहे. तर सावतामाळी चौक शेजारील भगवान दादा अपार्टमेंटमध्ये राहणारे शिक्षक कैलास एकनाथराव लगड यांच्या घरी रात्रीच्या दरम्यान चोरी झाली असून दिड तोळ्याचे गंठण, कानातील रिंग,  अंगठी, मोबाईल आणि साडेतीन हजार रूपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास करून लगड यांना मारहाण केल्याचीही घटना घडली आहे. याठिकाणी देखील डिवायएसपी सुधीर खिरडकर यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. या दोन्ही घरफोडीनंतर श्‍वानपथक, ठसेतज्ञ, एडीएस यांच्यासह तज्ञांनी भेट देवून पंचनामा केला आहे. शिवाजी नगर पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी जवाहर कॉलनी येथे भेट दिली तर सावतामाळी चौक येथील घटनेत पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान, पीएसआय बिराजदार, राठोड, अशफाक यांनी भेट दिली. 
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.