लाइव न्यूज़
जिल्हा रूग्णालयातच गॅस सिंलेडर प्लॅन्ट सुरू करावा- आ.जयदत्त क्षीरसागर
बीड, (प्रतिनिधी):- राज्यात जिल्हा रूग्णालयात गॅस सिंलेडर वेळेत मिळत नाहीत त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यासाठी राज्यातील शासकीय रूग्णालयात वेळेवर ऑक्सीजन गॅस सिंलेडर मिळण्यासाठी जिल्हा रूग्णालयातच गॅस सिंलेडर प्लॅन्ट सुरू करण्यात यावा असा तारांकीत प्रश्न उपस्थित करून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयाच्या संदर्भात अनेक महत्वाचे प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्यातील जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजनचे गॅस सिंलेडर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रूग्णांना आपला जीव गमवावा लागतो. दूर अंतरावरून सिंलेडर येई पर्यत रूग्ण दगावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उत्तरप्रदेशात शंभरपैक्षा जास्त बालकांचा मृत्यु केवळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झाला आहे. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी याच मुद्दावर राज्यातील रूग्णांलयाच्या संदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बोलतांना आ.क्षीरसागर म्हणाले की राज्यातील जिल्हा रूग्णालयातच गॅस सिंलेडर उपलब्ध नाहीत. सिलेडरचे प्लॅन्ट दूरवर असल्यामुळे रूग्णास वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करता येत नाही. गॅस उत्पादकांना वेळेवर पैसा आदा करता येत नाही त्यामुळे त्यांच्याकडून गॅसचा पुरवठा वेळेवर होत नाही. रूग्णालयातील अतिदक्षता विभागात ऑिक्सिजन गॅस सिलेडर उपलब्ध असणे गरजेचे आहे. या करिता गॅस सिलेडर तयार करणारे युनिट खरेदी करून त्या त्या शासकीय रूग्णालयात स्वतंत्र प्लॅन्ट उपलब्ध करून दिल्यास गॅस उत्पादन होवून ऑक्सिजनची समस्या दूर होईल. उत्तरप्रदेशात घडलेल्या घटनेप्रमाणे महाराष्ट्रात अशा घटना होवू नयेत यासाठी राज्य शासनाने ही उपाय योजना करावी आरोग्य विभागाच्या तारांकीत प्रश्नावर महत्वाचे मुद्दे उपस्थित करून सभागृहात आपले मत व्यक्त केले.
Add new comment