लाइव न्यूज़
पालकमंत्री ना. पंकजाताईंकडून सलीम जहॉंगिर यांच्या मागणीची दखल वाळू घाटांच्या लिलावातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश
बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने बांधकाम व्यावसायिक , कामगार , मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासंदर्भात गुरुवारी ( दि. ८ ) मुंबईत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेत जिल्हा भाजप नेते सलीम जहॉंगिर यांनी वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत ना. पंकजाताई यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून लिलाव प्रक्रियेशी संबधित माहिती जाणून घेत तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. याप्रश्नावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
बीड जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडल्याप्रश्नी भाजप नेते सलीम जहॉंगिर यांनी गुरुवारी (दि. ८) पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची मुंबई येथे भेट घेतली. जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने बांधकाम कामगार , मजूर आणि त्याच्याशी संबंधित अन्य रोजंदारी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.या प्रश्नी आपण स्वतः लक्ष घालून वाळू घाटांची शासन नियमाप्रमाणे लिलाव प्रक्रिया तातडीने सुरू करून हजारो कामगार , मजूर आणि बांधकाम व्यावसायिकांचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही मागणी सलीम जहॉंगिर यांनी पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली. प्रश्न सामान्य कामगार , मजुरांशी संबधित असल्याने ना. पंकजाताई यांनी तात्काळ बीड जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून वाळू घाट लिलाव प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. त्याच बरोबर वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवरील तांत्रिक अडचणीही दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Add new comment