बीड (प्रतिनिधी) डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) व स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने राज्यव्यापी ’युवा-विद्यार्थी जागर जत्था’चे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या ४ फेब्रुवारीपासून हे जत्थे राज्यभर युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करत आहे. नांदेड येथून सुरु झालेला मराठवाडा जत्था हा नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद या जिल्ह्यात फिरून गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात फिरत आहे. आज सकाळी या जत्थ्याचे आगमन शहरात झाले.