Add new comment

बीड जिल्ह्यात गारपिट ; पिकांना तडाखा

बीड ( प्रतिनिधी ) दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज पहाटे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली. बीड , माजलगाव तालुक्यासह अन्य ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पिकांना मोठा तडाखा बसला आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे रब्बीतील पिके धोक्यात आलेली असतानाच आज पहाटे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली. बीड तालुक्यातील पिंपळनेर , पौळाचीवाडी माजलगाव तालुक्यातील काळेगाव, हिवरा, डुबाथडी येथे ठिक सकाळी  7 वाजता जोरदार गारांचा पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी गारांचा थर साचल्याने चित्र पाहायला मिळाले. गेवराई, शिरूर सह अन्य तालुक्यातही गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.