लाइव न्यूज़
लिंबागणेशच्या भालचंद्र देवस्थान परिसर विकासासाठी दिड कोटी पालकमंत्री पंकजाताईंच्या माध्यमातून बालाघाटावरील तिर्थक्षेत्राचा विकास
लिंबागणेश (प्रतिनिधी) बीड जिल्हयातील तिर्थक्षेञ विकासासाठी भुतो न भविष्यती करोडो रुपये निधी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर केला जात आहे. बालाघाटावरिल लिंबागणेश येथील जागृत देवस्थान भालचंद्र गणपती मंदीर परिसराचा विकास व्हावा हि भावीक-भक्तांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासुन होती, त्याची दखल घेवून ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून दीड कोटी रुपये निधी विकास कामाकरिता मंजूर झाले असल्याचे माहिती भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली आहे.
लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती देवस्थान परिसर विकास करण्याकरिता भरीव आर्थिक निधी मंजूर करण्यासाठी युवानेते स्वप्नीलभैय्या गलधर यांनी व लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे व रामहरी दाभाडे यांनी भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. रमेश पोकळे यांनी लिंबागणेश येथील भावीक भक्तांच्या भावना लक्षात घेवून लिंबागणेश येथे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या समवेत जाऊन मंदीर परिसरात भव्य सभामंडप, संरक्षण भिंत बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व परिसर सुशोभिकरण या करिता, पर्यटन विकास योजनेतुन १.५० कोटी रु.चा आराखडा तयार केला होता. गेल्या १ वर्षापासुन हा विकास आराखडा मंजुर करण्याकरिता ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून रमेश पोकळे पर्यटन विभागाकडे सतत पाठपुरावा करत होते. त्यास यश मिळाले आहे.
वर्षभरापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश-रमेश पोकळे
बालाघाटावरील भालचंद्र गणपती देवस्थाच्या भाविक भक्तांना दिलेला शब्द आपण पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून पुर्ण केल्याचे समाधान आपणास वाटत असुन लवकरच पालकमंत्री पंकजाताईंच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर परिसरातील विकास कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती रमेश पोकळे यांनी दिली.
Add new comment