मुख्यमंञी फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायणगडाच्या विकास कामाच्या भूमिपूजनाची जय्यत तयारी - अा.मेटे
जिल्हाअधिकारी एम.डी सिंह कडुन अाढावा
बीड: तालुक्यातील श्री. क्षेत्र नारायणगड येथे २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमास ५० हजारांपेक्षा अधिक भाविक भाविक येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुवारी आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाºयांनी गडाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी सुरक्षेच्या अनुषंगाने यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे. आ. विनायक मेटे अध्यक्षस्थानी राहतील. या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी सुरु असून मंदिर परिसरात ५० हजार भाविक बसतील एवढा भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. गुरुवारी आ. मेटे, जिल्हाधिकारी एम.डी सिंह यांनी गडाला भेट दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारीही सोबत होते. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर जेथे लँन्ड होणार आहे, त्या जागेची पाहणी करण्यात आली. सभेचे ठिकाण, सामाजिक वनीकरण विभागाने उभारलेले वनोद्यानास भेट देऊन जिल्हाधिकारीने योग्य त्या सूचना दिल्या. मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्याचे आदेश त्यांनी वन विभागाला दिले. सोबतच स्वच्छता राखण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी महंत शिवाजी महाराज, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ.अभिजित पाटील, शिरुर ठाण्याचे निरीक्षक सुरेश चाटे, बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. नाईकवाडे, बीड उपविभागाचे अभियंता सय्यद, तहसीलदार अविनाश शिंगटे आदींची यावेळी उपस्थिती होती. शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, माजी आ. राजेंद्र जगताप, अशोक हिंगे, अनिल घुमरे,रामहरी मेटे, मनोज जाधव,गोपीनाथ घुमरे,पांडुरंग आवारे, आदी उपस्थित होते.
जिल्हाअधिकारी कडून गडाची पाहणी
हेलिपॅड, सभेचे ठिकाण व वनोद्यानास भेट दिल्यानंतर आ. विनायक मेटे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गडामध्ये जाऊन समाधीचे दर्शनघेतले. त्यानंतर त्यांनी गडामधील पुरातन वास्तूचीही पाहणी केली. यावेळी महंत शिवाजी महाराज यांनी जिल्हाधिकारी सिंह यांचा सत्कार केला. इतर अधिकाºयांचाही यावेळी सत्कार पार पडला.
२५ कोटींतून होणारी कामे अशी...
श्री क्षेत्र नारायगणगड विकास आराखडा
25 कोटींच्या विकास कामांची यादी
1. मंदिर परिसरात दगडी फरसी बांधकाम, वेस (प्रवेश व्दार) सुंदर असे वास्तु शिल्प चारही दिशांना, लँन्डस्कोप - 3 कोटी रू.
2. सार्वजनिक सुलभ शौचालय पुरूषांसाठी (25 क्षमता) स्त्रीयांसाठी (25 क्षमता) 80 लक्ष रू.
3. सिमेंट काँक्रिट वाहनतळ, बस स्थानक 1.50 कोटी रू.
4. विद्युतीकरण दोन ट्रन्सफारर्मर ( 100 के. व्ही.ए.), 6.00 कि.मी. एल.टी.लाईट, 2.70 कि.मी. एच.टी.लाईन - 75 लक्ष रू.
अंतर्गत व बाह्य सौर पथदिवे उभारणी व भक्त निवास सौलर वॉटर हिटर- 3 कोटी 30 लाख
5. भक्त निवास (1000 व्यक्ती), चार कक्षांचे विश्रामगृह, गरम व थंड पाण्याची व्यवस्था, आरओ फिलटर व्यवस्था- 3 कोटी रू.
6. संस्कृतीक सभागृह (25 हजार क्षमता)-3 कोटी रू.
7. दोन प्रसादालय (प्रत्येकी 2000 हजार क्षमता), गोशाळा (1000 पशु)- 3 कोटी रू.
8. योग्य ठिकाणी प्रतिक्षा कक्षामध्ये मंदिरातील गाभार्याचे लाईव्ह व्हि.डि.ओ. दर्शनासाठी एल.ई.डी स्क्रीन बसवीने.
9. पब्लीक अॅड्रेस सि.सि.टि.व्हि. स्पिकर - 50 लक्ष रू.
10. पोलीस मदत केंद्र (महिला व पुरूष स्वतंत्र) 30 लक्ष रू.
11. सामाना करिता डिजिटल लॉकर, चप्पल स्टॅन्ड- 20 लक्ष
12. पाय धुन मंदिरात जाता येईल अशी व्यवस्था - 15 लक्ष
13. दिशा दर्शक माहिती फलक- 5 लक्ष
14. रेस्टॉरंट, विक्री केंद्र व वस्तु संग्राहालय- 1 कोटी 50 लाख.
Add new comment