लाइव न्यूज़
Add new comment
घरासमोर उभी केलेली कार दिली पेटवून

बीड (प्रतिनिधी) शहरातील पेठ बीड भागातील आकाशवाणी केंद्राच्या बाजुच्या परवाना नगर भागात घरा समोर उभी केलेली कार अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला आहे. परवाना नगर भागातील रहिवाशी गायकवाड यांच्या मालकीची (एमएच ३१- ३२५५) कार घरासमोर लावली होती. सूत्रांनी सांगितल्या नुसार पहाटे चार वाजता कारच्या बाजूने धूर निघू लागला. थोड्याच वेळात धूराचे रूपांतर मोठ्या आगीत झाले व गायकवाड यांची कार जळून खाक झाली. कार ला आग लागली की, लावली याबाबत अधिक माहिती पोलिस तपासातच पुढे येईल. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
